Advertisement

दिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’चा ट्रेलर, म्युझिक लाँच सोहळा


दिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’चा ट्रेलर, म्युझिक लाँच सोहळा
SHARES

काही लोक धर्माचा-जातीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी कसा करून घेतात यावर भाष्य करणारा ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात पार पडला.

चेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ आज समाजामध्ये धर्माचं, जातीपातीचं राजकारण खेळलं जातं. त्यामुळे अनेकांचे नुकसान झालं आहे.

तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है, जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता अधिकच वाढली आहे.


हे कलाकार दिसणार लग्न मुबारकमध्ये

या सिनेमामध्ये सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासह अभिनेत्री प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, प्रवीण तरडे, अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर सिद्धांत मुळे, हा फ्रेश चेहरा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय अभिनेता महेश मांजरेकर विशेष भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या ११ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा