Advertisement

रहस्य वाढवणार ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर!


रहस्य वाढवणार ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर!
SHARES

चित्रपटाची उत्सुकता वाढवणारे ‘Once मोअर’ या आगामी चित्रपटाचं पोस्टर आणि त्याची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात नेमकं काय असणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिल्या प्रोमोवरून रहस्यावर आधारित हा चित्रपट असल्याचं लक्षात आलं होतं, मात्र चित्रपटातील व्यक्तिरेखांचा खुलासा यातून झाला नव्हता. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या टीझरमधून हा खुलासा होणार असून, यातून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.


‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’

‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’ अशी टॅग लाईन असलेल्या या टीझरमधून भेटीला आलेल्या या सर्व व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा १२ ऑक्टोबरला होईल. आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी या नव्या चेहऱ्यांसोबत रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार, विष्णू मनोहर, नरेश बीडकर आदी मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकार या चित्रपटात आहेत.


'यांचं' निर्मिती क्षेत्रात पदार्पण

या चित्रपटाचं दिग्दर्शन नरेश बिडकर यांचं आहे. विष्णू मनोहर, निलेश लवंदे, अभय ठाकूर सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा