Advertisement

प्रेमाची 'रॉमकॉम' गोष्ट लवकरच पडद्यावर!


प्रेमाची 'रॉमकॉम' गोष्ट लवकरच पडद्यावर!
SHARES

प्रेम या विषयावर आजवर अनेक चित्रपट आले. तरी प्रत्येक चित्रपटात प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा बघायला मिळाल्या. असाच प्रेमाचा वेगळा रंग घेऊन 'रॉमकॉम' प्रेक्षकांसमोर येत आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त सोहळा पार पडला.

'रॉमकॉम' या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. चित्रपटांसाठी वेडा असलेला राहुल आणि सुसंस्कृत घरातली सुमन यांच्यातलं प्रेम यशस्वी होतं का? सुमनला मिळवण्यासाठी राहुलला काय काय करावं लागतं? हे मनोरंजक आणि धमाल पद्धतीनं या चित्रपटात पहायला मिळणार आहे.


'रॉमकॉम'मध्ये कलाकारांची फौजच!

अभिनेते किशोर कदम आणि छाया कदम या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यांच्यासह अभिनेते अशोक शिंदे, स्वाती पानसरे आहेत. सारंग दोशी आणि मधुरा वैद्य ही जोडी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहेत.


बरीच वर्ष हिंदीत काम करूनही मराठी भाषा, चित्रपटांविषयी आपुलकी मनात होती. म्हणून पहिला चित्रपट मराठीमध्ये करतो आहे. 'रॉमकॉम' ही एक धमाल गोष्ट आहे. वेगळीच प्रेमकहाणी या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळेल.

सचिन शिंदे, निर्माता 



हेही वाचा

माधुरीसोबत करण जोहरही 'बकेट लिस्ट'मध्ये!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा