Advertisement

प्रेक्षकांनो, अनुभवा नात्यांचा 'सोहळा'


प्रेक्षकांनो, अनुभवा नात्यांचा 'सोहळा'
SHARES

जुन्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. मात्र आता कुटुंबाला मायक्रो फॅमिलीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. अशाच छोट्या कुटुंब पद्धतीवर आधारित 'सोहळा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अरिहंत फिल्म प्रोडक्शन निर्मित 'सोहळा' या चित्रपटाचं दिग्दर्शन गजेंद्र अहिरे, तर या चित्रपटाची निर्मिती सोहन बोकडिया आणि सुरेश गुंडे यांनी केली आहे. या सिनेमात सचिन पिळगावकर, शिल्पा तुळसकर, आस्था खामकर, लोकेश गुप्ते यांच्यावर एक पार्टी साँग चित्रीत करण्यात आलं आहे.


चित्रपटाची हटके मांडणी

बदलती कुटुंबपद्धती आणि नातेसंबंधात झालेला बदल सोहळा या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या विषयावर आधारीत मराठीत अनेक चित्रपट आले. मात्र या चित्रपटाची मांडणी काहीशी हटके आहे.


हे कलाकार प्रमुख भूमिकेत


या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकेत आहेत. यांच्याबरोबर विक्रम गोखले, लोकेश गुप्ते, मोहन जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाच्या नावातच चित्रपटाची कथा लपलेली आहे. हा माणसांच्या नात्यातील आगळावेगळा सोहळा आहे, असं मत सचिन पिळगावकर यांनी चित्रपटाविषयी बोलताना व्यक्त केलं. तर अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी हा चित्रपट म्हणजे उत्तम अनुभव असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पिळगांवकर आणि गजेंद्र अहिरे यांच्यासोबत काम करणे चांगला अनुभव असल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा