Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

‘टकाटक’च्या यशानंतर आता येणार ‘टकाटक २’

‘टकाटक’ हा मराठी चित्रपट आता सिक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘टकाटक’च्या यशानंतर आता येणार ‘टकाटक २’
SHARES

बॉक्स ऑफिसवर तूफान गाजलेला आणि परिक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट आता सिक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’नं विक्रमी व्यवसाय करत २०१९च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं.

लॉकडॉऊनच्या पार्श्वभूमीवर आता ‘टकाटक २’ची घोषणा करण्यात आल्यानं सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसंच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक २’ची अधिकृत घोषणा केली आहे. याप्रसंगी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक २’चं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं.

‘टकाटक’ची कथा तरूणाईवर आधारित होती. यासोबतच या चित्रपटात एक मेसेजही दडला होता. त्यामुळे ‘टकाटक २’ या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच ‘टकाटक २’ची कथा आणि पटकथा लिहिली असून संवाद किरण बेरड यांचे आहेत.

गीतकार जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीतकार वरूण लिखते संगीतबद्ध करणार असून हजरत शेख वली या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. ‘टकाटक २’मधील कलाकारांची नावे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

‘टकाटक’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यानं ‘टकाटक २’च्या रूपात पुढील भाग आणण्याची कल्पना सुचल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी सांगितलं. ‘टकाटक २’मध्ये प्रेक्षकांना सुमधूर गीत-संगीतानं सजलेली एक फ्रेश प्रेमकथा पहायला मिळणार आहे.

‘टकाटक’ला मिळालेल्या यशानंतर पुढील भाग बनवताना जबाबदारी आणखी वाढली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना रूचेल, पटेल, भावेल असं काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न आहे, जो त्यांना नक्कीच आवडेल अशी खात्री मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे.संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा