Advertisement

‘टकाटक 2’चे शूटिंग पूर्ण, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘टकाटक 2’ या चित्रपटाचे चित्रिकरण कोरोना आणि लॉकडाऊनच्या भयावह वातावरणातही पूर्ण झालं आहे.

‘टकाटक 2’चे शूटिंग पूर्ण, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

‘टकाटक 2’ या चित्रपटाचे चित्रिकरण कोरोना आणि लॉकडाऊनच्या भयावह वातावरणातही पूर्ण झालं आहे. हे केवळ प्रेक्षकांचं प्रेम आणि शुभेच्छांच्या बळावरच शक्य झाल्याचं मत ‘टकाटक 2’च्या टीमनं व्यक्त केलं आहे.

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम यांनी याची निर्मिती केली. तर जगत सिंग यांची सहनिर्मिती असलेल्या ‘टकाटक 2’च्या टीमनं गोव्यामध्ये मुहूर्तानंतर लगेचच तिथलं शूटिंग पूर्ण केलं.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गोव्यात शूटिंगवर बंदी घालण्यात आली होती. दुस-या लॉकडाऊननंतर पुन्हा निर्बंध शिथिल होताच ‘टकाटक 2’च्या टीमनं बारामती आणि भोरमध्ये शूटिंग करण्याची योजना आखली. ‘टकाटक 2’चं बारामती आणि भोर इथलं अखेरचं शूटिंग शेडयुल नुकतंच निर्विघ्ननपणे संपन्न झालं.

कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत ‘टकाटक 2’चं चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी दिली आहे. या चित्रपटात प्रथमेश परब सोबत अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत.

 ‘टकाटक 2’च्या माध्यमातून मिलिंद कवडे यांनी पुन्हा एकदा तरूणाईला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवला आहे. ‘टकाटक 2’मध्ये प्रथमेशनं साकारलेल्या ठोक्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं होतं. आता हा ठोक्या ‘टकाटक 2’मध्ये कशा प्रकारची धम्माल करतो ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शनासोबतच ‘टकाटक 2’ची संकल्पना दिग्दर्शक, कथा आणि पटकथाही मिलिंद कवडे यांचीच आहे. संवादलेखन किरण बेरड यांनी केलं असून, हजरत शेख वली या चित्रपटाचे डीओपी आहेत.

गीतलेखनाची जबाबदारी जय अत्रे यांनी सांभाळली असून, वरूण लिखते यांनी संगीताद्वारे वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आहे. निलेश गुंडाळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानं ‘टकाटक 2’ची संपूर्ण टीम खूप आनंदी आहे.



हेही वाचा

कान्स चित्रपट महोत्सवात 'भारत माझा देश आहे'चा प्रीमियर

अजाणावर भाष्य करणारा 'भोंगा' चित्रपट या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा