Advertisement

नाशिकची गाथा सांगणार 'नाशिकचा मी आशिक...'


नाशिकची गाथा सांगणार 'नाशिकचा मी आशिक...'
SHARES

'नाशिकचा मी अशिक...' हे नाशिकची गाथा सांगणारं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा टिझर नुकताच लॉन्च झाला असून, अल्पावधीत त्याचा व्हिडीओ हजारों लोकांनी पहिला आहे. सोशल मिडियावरही या टिझरला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत आहे. या गाण्यासाठी गायक-संगीतकार प्रवीण कुवर आणि हर्षवर्धन वावरे यांनी आवाज दिला असून, दिग्दर्शन प्रसाद आप्पा तारकर यांनी केलं आहे.


गीतकार मंदार चोळकर म्हणतात...

गाण्यातील शब्दरचनेवरूनच हे गाणं नाशिककरांच्या मनाचा ठाव घेणारं असल्याचं जाणवतं. संगीतकार प्रवीण कुवर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. अवधूत वाडकर यांनी नाशिकच्या भव्यतेचा तसंच निसर्गसौंदर्याचा विचार करूनच या गाण्याची रचना केली असल्याचे गीतकार मंदार चोळकरचं म्हणणं आहे.

चित्रीकरणाचा शुभारंभ नाशिकमध्ये

अभिनेता सुबोध भावे, 'बिग बॉस' फेम स्मिता गोंदकर तसेच 'काहे दिया परदेस' फेम सायली संजीव, मयुरी शुभानंद आणि नाशिकचे कलाकार या गाण्यात झळकणार आहेत. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन करणार असून, लवकरच नाशिक येथेच या गाण्याच्या चित्रीकरणाचा शुभारंभ केला जाणार आहे.


गौरवगीतं तयार करण्याचा ट्रेंड

भारतातील विविध राज्यांमागोमाग सध्या महाराष्ट्रातील आघाडीच्या शहरांवर आधारित गौरवगीतं तयार करण्याचा ट्रेंड आहे. काही दिवसांपूर्वी सचिन पिळगावकरांनी परफॅार्म केलेल्या मुंबई गीताला मुंबईकरांची नाराजी ओढवून घ्यावी लागली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या नशिकची गाथा सांगणारं 'नाशिकचा मी आशिक...' हे गाणं प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या गाण्याला कशा प्रकारे साथ देतात ते पाहायचं आहे.

संबंधित विषय
Advertisement