Advertisement

आशुतोष गोवारीकरांच्या 'पानीपत'चा पोस्टर रिलीज


आशुतोष गोवारीकरांच्या 'पानीपत'चा पोस्टर रिलीज
SHARES

ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यामध्ये हातखंडा असलेले दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. गोवारीकर प्रेक्षकांसमोर आता पानीपतचा इतिहास उलगडणार आहेत. पानीपत या सिनेमासाठी स्टार कास्टपण नुकतीच फायनल करण्यात आली आहे. या सिनेमात संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सॅनन आपल्याला दिसणार आहेत.

हा सिनेमा १७६१ मध्ये झालेल्या पानीपतमधील तिसऱ्या युद्धाच्या कथेवर आधारीत आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आलं. कृती सॅननने हा पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

 याआधी अशुतोष गोवारीकर यांनी लगान, जोधा अकबर, स्वदेस, मोहनजो दारो यांसारखे दमदार चित्रपट केले. आशुतोष यांच्या लगान या चित्रपटाने इतिहास घडवला होता. लगान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले. मात्र गेल्या वर्षी आलेल्या मोहनजो दारो या चित्रपटाची फारशी जादू प्रेक्षकांवर चालली नाही. आता पुन्हा एकदा आशुतोष गोवारीकर प्रेक्षकांसाठी ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत.

अर्जुन कपूर आणि कृती सेनन हे दोघेही पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात काम करत आहेत. त्याचबरोबर संजय दत्त या चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा