Advertisement

प्रवीण कुवरच्या आवाजात घुमणार 'फुगडी'चा स्वर


प्रवीण कुवरच्या आवाजात घुमणार 'फुगडी'चा स्वर
SHARES

झी मराठी वाहिनीवरील ‘लगीर झालं जी’ या मालिकेचं पार्श्वगीत, ‘ये रे ये रे पावसा’ चित्रपटाचं टायटल साँग, ‘लव्ह लफडे’ या चित्रपटातील 'ताईच्या लग्नाला…' यासारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांचं आणखी एक नवं चित्रपट गीत लवकरच रसिक दरबारी सादर होणार आहे. 


चित्रीकरणाला लवकरच सुरुवात

प्रवीण यांच्या आवाजातील नवं कोरं चित्रपट गीत लवकरच रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज होणार आहे. या चित्रपटचं शीर्षक मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. या निनावी चित्रपटातील ‘फुगडी…’ या गाण्याचं नुकतंच प्रवीण कुवर यांच्या आवाजात रेकॉर्डिंग करण्यात आलं. अंधेरीतील युफोनी स्टुडिओमध्ये रेकार्ड करण्यात आलेल्या या गाण्याच्या चित्रीकरणालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. 


'या' गाण्यावर 'हा' कलाकार थिरकणार

हे गाणं नवोदित गीतकार रमझान पठाण यांनी लिहिलं असून, दिग्दर्शन सुकेश सावर्डेकर यांनी केलं आहे. या गाण्यावर अभिनेता चेतन कुमावत थिरकणार असून, चेतनने याआधी बरीच व्यावसायिक नाटकं, ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा चित्रपट, तसंच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘कुंकू टिकली टॅटू’ या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेत त्याने साकारलेला खलनायक विशेष गाजला. त्यामुळे आता या गाण्यात तो काय धम्माल करणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा