Advertisement

‘टेक केअर गुड नाइट’चा ट्रेलर प्रदर्शित


‘टेक केअर गुड नाइट’चा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

काही सिनेमे शीर्षकांमुळेच खूप चर्चेत येतात. त्यापैकीच एक आहे ‘टीसीजीएन’. ‘टीसीजीएन’ म्हणजेच ‘टेक केअर गुड नाइट’ या आगळ्यावेगळ्या शीर्षकामुळे उत्कंठा वाढवणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच मुंबईमध्ये कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला.

या सोहळ्याला सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील प्रमुख कलाकारांसोबत प्रथमच सिनेमाचं दिग्दर्शन करणारे नामांकित लेखक-नाट्यदिग्दर्शक गिरीश जोशीही उपस्थित होते.


कधी होणार प्रदर्शित?

या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांनी त्याला संगीत दिलं आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला ‘टेक केअर गुड नाईट’ हा चित्रपट ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.


चित्रपटाची कथा?

या चित्रपटाची कथा ही शहरातील एका कुटुंबाची आहे. या कुटुंबाने आपलं स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचं त्यांचं अज्ञान दूर करून घ्यावं लागतं.

आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला याकामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडिलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच, पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.


गिरीश जोशींचं मत

या सिनेमाबाबत जोशी म्हणले, या संकल्पनेचा जन्म त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डवरून ऑनलाइन काढले गेले आहे. जगभरात लाखो लोक मोबाइल, क्रेडीट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात.

या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते, हे मला शोधून काढायचं होतं. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणं खूप गरजेचं वाटल्याचं जोशी म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा