Advertisement

चार उनाड पोरांची कथा 'यंग्राड'


चार उनाड पोरांची कथा 'यंग्राड'
SHARES

मराठी बोलीभाषेतील प्रचलित शब्द म्हणजे यंग्राड! पण यंग्राड या शब्दाचा नक्की अर्थ काय? हे अनेकांना माहीत नसेल. खरंतर नाशिकमध्ये उनाड मुलांना यंग्राड असं म्हणून संबोधलं जातं. अशाच चार उनाड म्हणजेच यंग्राड पोरांवर आधारीत असलेला यंग्राड हा मराठी चित्रपट ६ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे.


काय आहे यंग्राडची कथा?

एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणे यासाठी या चित्रपटातील चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचं आयुष्यच विस्मरणात गेल्यासारखं होतं. त्यानंतर मग ते स्वत्वाचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात.


चित्रपटात कलाकार कोण?

या चित्रपटात चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, शिरीन पाटील, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, जीवन कराळकर, विठ्ठल पाटील, शंतनू गणगणे, सविता प्रभुणे आणि शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


यांची निर्मिती

या मराठी चित्रपटाची निर्मिती फँटम फिल्म्स, फ्युचरवर्क्स मिडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स या संस्था एकत्रित येत करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन मकरंद माने यांनी केलं असून त्यात चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ आणि जीवन कराळकर या चार युवकांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा