• माघी गणेशोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धा
  • माघी गणेशोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धा
SHARE

साठेनगर - चेंबूरच्या साठेनगर परिसरात माघी गणेशोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. साठेनगर उत्सव मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लहान मुलांनी मराठी आणि हिंदी गाण्यांवर ठेका धरला. या वेळी मुलांना बक्षिसंही देण्यात आली. मुलांमध्ये अभ्यासासोबत कलेची देखील आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचं साठेनगर उत्सव मंडळाचे अध्यक्ष विकी जाधव यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या