Advertisement

न्युक्लियाच्या गाण्यावर पुन्हा थिरकली तरुणाई


न्युक्लियाच्या गाण्यावर पुन्हा थिरकली तरुणाई
SHARES

भारताचा बॉस ऑफ व्हॉईस म्हणून परिचित असलेल्या न्युक्लियाच्या गाण्यावर सात हजार तरुणाईने डी. वाय. पाटील कॉलेजच्या मैदानावर शनिवारी संध्याकाळचे चार तास मनमुराद आनंद लुटला. रेड बुल म्युझिकने आयोजित केलेल्या या म्युझिक कॉन्सर्टमधील आकर्षक रोषणाई आणि पाश्चात्य गीतांचा अविस्मरणीय आनंद नवी मुंबईतील तरुणाईने घेतला.


नवी मुंबईत म्युझिक कॉन्सर्टचा उत्साह

नेरुळच्या डी. वाय. पाटील कॉलेजचा ‘औरा’ या वार्षिक महोत्सवात रेडबुल म्युझिकने आयोजित केलेला न्युक्लिया अॅण्ड व्हाईसव्हर्सा हा म्युझिक कॉन्सर्ट मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी न्युक्लिया आणि व्हाईसव्हर्सा बॅंडचे आगमन होताच सर्व तरुणाईने हात उंचावून आणि टाळ्या वाजवून त्यांचे नेरुळ नगरीत स्वागत केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या चल हट, ऑल आय नीड आणि रावडी या लोकप्रिय गाणीही सादर केली.


या गाण्याने कार्यक्रमाची सांगता

भारताचा बॉस ऑफ व्हॉईस म्हणून परिचित असलेल्या न्युक्लियाने लॉंग गव्च्छा, अक्कड बक्कड, सिन क्या हे, जंगली राजा ही गाणी गाऊन तरुणाईला आपलेसे केलं. तर बंगला बास या त्याच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता केली. ज्याला उपस्थितांकडून मनापासून प्रतिसाद मिळाला. भारतातही लोकप्रिय ठरलेल्या न्युक्लियाने रेडबुल म्युझिकने आपल्याला ही संधी दिल्याबद्दल त्याने त्याच्या गाण्याच्या शैलीतच आभार व्यक्त केला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा