Advertisement

'शिवसेना-बाळासाहेब': एकनाथ शिंदे गटाचे नवे नाव जाहीर करण्याची शक्यता

शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा, असं आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल बंडखोरांना दिलं होतं. पण ते त्यांचंच नाव ठेवणार असल्याची शक्यता आहे.

'शिवसेना-बाळासाहेब': एकनाथ शिंदे गटाचे नवे नाव जाहीर करण्याची शक्यता
SHARES

एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल पुढे टाकत मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचे नाव ठेवल्याची माहिती मिळत आहे. एबीपीच्या सुञांनी ही माहिती दिली. 

शिवसेना-बाळासाहेब ठाकरे असं नाव शिंदे गटानं निश्चित केलं आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा, असं आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल बंडखोरांना दिलं होतं. पण ते त्यांचंच नाव ठेवणार असल्याची शक्यता आहे. 

एकनाथ शिंदेंनी आपल्या गटासाठी शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

आम्ही शिवसैनिकच आहोत आणि शिवसैनिकच राहू. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या हिंदुत्त्वाच्या मार्गावर आम्ही वाटचाल करत आहोत, असं शिंदे बंड केल्यापासून सांगत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेना हिंदुत्त्वापासून दूर गेल्याची शिंदेंसोबतच्या आमदारांची भावना आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशीविरोधा एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  

शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी 12 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी चार आमदारांना अशा एकूण 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती.

त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील 16 आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली. त्यानंतर आता शिंदे गटाने या नोटीशीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा