Advertisement

आता तरी जागं व्हा!


आता तरी जागं व्हा!
SHARES

एलबीएस मार्ग - झोपलेल्या आणि भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यांना जागं करण्यासाठी भांडुपकरांनी घंटानाद आंदोलन केलं. फ्री अ बिलियन संस्थेतर्फे एस वॉर्ड कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आलं. भांडुप परिसरात फेरीवाल्यांनी अडवलेले फुटपाथ, खड्डेमय रस्ते, तुंबलेले नाले अशा कामांसह पालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात हे आंदोलन होतं. या वेळी केवळ आश्वासनं नको, अधिकाऱ्यांनी लेखी निवेदन द्यावं, अशी मागणी विद्यार्थी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली.

संबंधित विषय
Advertisement