Advertisement

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या मित्रानेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ

अमेय घोले यांचा राजीनामा हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. अमेय घोले हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या मित्रानेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ
SHARES

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक अमेय घोले यांनी सोमवारी युवासेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. घोले यांचा राजीनामा हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

घोले शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा होती. त्यांनी काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेच्या कोअर कमिटीचा राजीनामा दिला होता. आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरून घोले यांना पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते.

शिंदे गटाच्या एका नेत्याने सांगितले की, मोठ्या संख्येने माजी नगरसेवक पालिका निवडणुकीच्या घोषणेची वाट पाहत आहेत. निवडणूक जाहीर होताच 25 ते 30 माजी नगरसेवक आमच्यासोबत येतील.

आदित्य ठाकरे यांना दिलेल्या राजीनामा पत्रात घोले यांनी माजी महापौर श्रद्धा जाधव आणि सूरज चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले असून उद्धव ठाकरे गट सोडण्यासाठी या दोन नेत्यांना एकप्रकारे जबाबदार धरले आहे.

अमेय घोलेंच्या राजीनाम्यात काय?

तुमच्यामुळे (आदित्य ठाकरे) मी राजकारणात आलो आणि प्रत्येक जबाबदारी पार पाडली, असे घोले यांनी पत्रात लिहिले आहे. गेली 13 वर्षे पक्षासाठी काम केले. वडाळा विधानसभेत काम करत असताना श्रद्धा जाधव आणि सूरज चव्हाण नेहमी कामात अडथळे आणत होते, त्यामुळे खूप त्रास होत होता. याबाबत अनेकवेळा कळविले, मात्र तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे युवा सेना सोडताना मी कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.

गणेशोत्सवादरम्यान चर्चांना उधाण

अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राज्याच्या राजकीय संस्कृतीनुसार मी त्यांचे स्वागत केल्याचे घोले म्हणाले होते. त्यानंतर घोले हे खासदार राहुल शेवाळे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती.



हेही वाचा

15 दिवसात दिल्ली-महाराष्ट्रात दोन मोठे राजकीय भूकंप होणार : सुप्रिया सुळे

ठाकरे गटाला हायकोर्टाचा झटका, पालिकेची प्रभाग संख्या २२७ राहणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा