Advertisement

औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावलं

आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे, त्याच्यात औरंगजेब बसत नाही, असं म्हणत औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.

औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावलं
SHARES

औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे, त्याच्यात औरंगजेब बसत नाही, असं म्हणत औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं राज्य आल्यापासून आणि मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्थानापन्न झाल्यापासून औरंगाबाद (aurangabad) शहराचं नामकरण संभाजीनगर करा, अशी मागणी होत आहे. त्यातच औरंगाबाद महापालिकेची निवडणूक देखील जवळ येऊन ठेपल्याने या मागणीने जोर धरला आहे. तर दुसऱ्या बाजूला कुठल्याही शहराच्या नामकरणाला विरोध असल्याचं काँग्रेसने ठामपणे सांगितलं आहे. 

त्यावर प्रसारमाध्यमांनी विचारलं असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा करण्यात आलेल्या उल्लेखात नवीन काय आहे?  जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे,, तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार. औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे, त्याच्यात औरंगजेब बसत नाही.

हेही वाचा- संभाजी राजेंचं नाव वापरणं हा काही गुन्हा नाही- संजय राऊत

त्याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी ट्विटरवरील उल्लेखानंतर नाराजी व्यक्त करताना, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला काँग्रेसचा (congress) ठाम विरोध आहे, असं ठणकावून सांगितलं होतं. 

तर, औरंगाबादचं नामांतर वा कुठल्याही शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावरील विषय नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव २० वर्षांपूर्वीच आम्ही अमान्य केला होता. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही, असं मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलं होतं.

या नामकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्याने नामांतरावरून महाविकास आघाडीत फूट पडणार असा दावा विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येऊ लागला. शिवाय औरंगाबाद महापालिका आमच्या ताब्यात द्या आम्ही ताबडतोब नामबदलाचा प्रस्ताव पारित करू असं आश्वासनही भाजपने दिलं. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा