Advertisement

संभाजी राजेंचं नाव वापरणं हा काही गुन्हा नाही- संजय राऊत

राज्यातील सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावावर चालतं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याने काहीही बिघडलेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.

संभाजी राजेंचं नाव वापरणं हा काही गुन्हा नाही- संजय राऊत
SHARES

राज्यातील सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावावर चालतं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याने काहीही बिघडलेलं नाही. सरकारने संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा काही गुन्हा, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्री कार्यलयाच्या (cmo) अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. त्यानंतर हे ट्विट तातडीने डिलिट करण्यात आलं. परंतु या परस्पर झालेल्या नामांतरावर संताप व्यक्त करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला (shiv sena) किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली. तसंच नामांतराला ठाम विरोध असल्याचंही ठणकावून सांगितलं. 

हेही वाचा- ‘संभाजीनगर’च्या परस्पर नामांतरावरून काँग्रेसमध्ये संताप

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला काँग्रेसचा (congress) ठाम विरोध आहे, असं बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी सांगितलं.

तर, कोणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणी भावनिक मुद्दे काढतं, तर कोणी विकासाच्या मुद्द्यावर बोलतं, गेल्या ६० वर्षापासून महाराष्ट्रात हेच सुरू आहे, आज औरंगाबादबद्दल बोललं जातंय, उद्या पुणे, अहमदनगर, नाशिक वैगेरे अनेक शहरांची नावं बदलण्याची मागणी केली जाईल, त्यामुळे मागणी करण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) म्हणाले.

त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलं असता, राज्यातील सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं चालतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचं नाव सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर वापरणं हा गुन्हा आहे, असं मला असं वाटत नाही, शेवटी सरकार हे लोकभावनेवर चालतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे, अशी भूमिका संजय राऊत (sanjay raut) यांनी मांडली.

(shiv sena mp sanjay raut reacts on aurangabad name change issue)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा