Advertisement

भोमसिंग राठोडांच्या शिवसेना प्रवेशाचा काँग्रेसला धक्का


भोमसिंग राठोडांच्या शिवसेना प्रवेशाचा काँग्रेसला धक्का
SHARES

कुरारगाव - कुरारगावचे विद्यमान नगरसेवक भोमसिंग राठोड यांनी रविवारी शिवसेने प्रवेश केल्यानं काँग्रेसला खिंडार पडलंय. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात भोमसिंग राठोड हे गेले पंधरा वर्ष काँग्रेसचे नगरसेवक होते. राठोड हे राजपूत घराण्याचे असून, ते मारवाडी समाजाचे आहेत. राठोड यांच्या शिवसेना प्रवेशामुळे 50 टक्के मारवाडी समाजाची मतं शिवसेनेला मिळणार आहेत. राठोड नेतृत्व करत असलेला वॉर्ड क्र 38 नव्या वॉर्ड रचनेत 39 झाला असून तो महिलांसाठी आरक्षित झालाय. दरम्यान जर पक्षप्रमुखांनी निवडणूक लढवण्यास सांगितली तरच निवडणूक लढवणार अन्यथा शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचं राठोड म्हणालेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा