जानकरांच्या अडचणीत वाढ

 Pali Hill
जानकरांच्या अडचणीत वाढ

मुंबई - निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात दुग्धविकास आणि पशुधन मंत्री महादेव जानकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हस्तक्षेप करण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिलाय. निवडणूक आयोगाचे आदेश रद्दबातल करणं आणि जेएमएफसी कोर्टाच्या चौकशीच्या आदेशावर स्थगिती आणण्यासंदर्भात महादेव जानकर यांनी याचिका दाखल केली होती. गडचिरोलीतल्या वडसा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली होती. शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनाही यावेळी जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिल्या. यासंदर्भातला व्हिडिओही व्हारल झाला होता.

Loading Comments