इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप


  • इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप
SHARE

मुंबई - मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि जिल्हापरिषदांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या निकालांमध्ये मतदारांनी भाजपाच्या बाजूने भरभरून कौल दिल्याचं पाहायला देखील मिळालं. मात्र आता इव्हीएम मशीनच्या घोळाचा वाद समोर आलाय. मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधक करू लागलेत. युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांनी तर महाराष्ट्रात फेर मतदानाची मागणी केलीय. रवी राणा यांच्यासह मुंबईतील अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील राज्य निवडणूक आयोगाला फेर मतदान व्हावं यासाठी पत्र दिलंय. एकीकडे मुंबईतील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिलेत. त्यातच आता इव्हीएम मशीनच्या घोळाचा आरोप त्यामुळे निवडणूक आयोग आता याची दखल घेणार का? हे पहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या