Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

तर ते हवेतला आॅक्सिजन पण शिल्लक ठेवणार नाहीत, नितेश राणेंची पवारांवर टीका

तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

तर ते हवेतला आॅक्सिजन पण शिल्लक ठेवणार नाहीत, नितेश राणेंची पवारांवर टीका
SHARES

महाराष्ट्रात आॅक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी आॅक्सिजन निर्मितीत पुढाकार घेण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यावर तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही, अशा शब्दांत भाजप (bjp) नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, साहेब आपण काही करू नका. महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील, असा आरोप देखील निलेश राणे यांनी केला.

हेही वाचा- महाराष्ट्राला परदेशातून लस आयातीला परवानगी द्या- उद्धव ठाकरे

दरम्यान राज्यात दररोज ६० हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक रुग्ण सध्या ऑक्सिजनवर आहेत. तर राज्यात ७६,३०० ऑक्सिजन बेड्स आहेत.  महाराष्ट्राला (maharashtra) दररोज १५५० मे टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ३०० ते ३५० मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे. सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मे टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्यामुळे सातत्याने केंद्राकडे आॅक्सिजनची मागणी करण्यात येत आहे. 

हे गांभीर्य लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी  राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून राज्यातील सहकारी आणि खाजगी १९० कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.  

गेल्या वर्षी कोरोना (coronavirus) संकटात जेव्हा राज्यात सॅनिटायझरची कमतरता भासत होती. तेव्हा राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती करुन त्याचा बाजारात पुरवठा केला होता.

(bjp leader nilesh rane slams ncp chief sharad pawar on oxygen plant at suger mills)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा