राडेबाज राजकारणी

राडेबाज राजकारणी
राडेबाज राजकारणी
See all
मुंबई  -  

मुंबई - युती आणि आघाडी तुटल्याने यंदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आणि पक्षांचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. मात्र, यातच आता राजकीय पक्षांमध्ये उघड उघड वैमनस्य पाहायला मिळालं आणि त्याचंच रुपांतर बुधवारी राड्यात झालं. मुंबईतील दोन ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यंमध्ये राडा झाला.


अॅन्टॉप हिल परिसरात बुधवारी दुपारी भाजपा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली.

 

 


तर दुसरीकडे त्याचदिवशी मालवणीमध्ये भाजपा- कॉग्रेस कार्यकर्त्यामध्ये वाद झाले. पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने दोन्ही ठिकाणी तणाव वाढला नाही.

 


दरम्यान, अॅन्टॉप हिलमधील अज्ञात आरोपींवर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. तर पोलिसांसोबत हाणामारी करणारे कार्यकर्ते भाजपाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या भाजपा आणि त्यांच्या या कार्यकर्त्यांना शिक्षा व्हीवी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे पत्र व्यवहार करणार असल्याचे सांगत जर कारवाई झाली नाही तर आम्ही नाइलाजाने उपोषण करू असा इशारा वॉर्ड क्र. 176 चे मनसे उमेदवार संजय भोगले यांनी दिला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.