• अजोय मेहता यांची केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्ती
  • अजोय मेहता यांची केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्ती
  • अजोय मेहता यांची केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्ती
SHARE

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्यासह सहा वरिष्ठ  सनदी अधिकाऱ्यांची केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकंय्या नायडू यांच्या मंत्रालयात होणार आहे. ते येत्या 20 मे रोजी नवा पदभार स्विकारतील. 

अजोय मेहता यांच्या जागी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त म्हणुन यू. पी. एस मदान यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी उशिरा यासंदर्भातले आदेश जारी करण्यात आले. मेहता यांच्यासोबतच संजय भाटिया, मालिनी शंकर, अजय भूषण पांडे, मुकेश खुल्लर आणि भगवान सहाय या अधिकाऱ्यांचीही अन्यत्र नियुक्ती होणार आहे. 

अजोय मेहता हे 1994 बॅच चे अधिकारी आहेत तर यु. पी. एस मदान हे 1983 बॅच चे अधिकारी आहेत. मदान हे सध्या सर्वात वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. शिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि विश्वासातले अधिकारी म्हणून ओळखले जातात. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या