विधीमंडळातील पहिल्याच भाषणात मुख्यमंत्र्यांकडून ‘या’ मराठी माणसाचं कौतुक

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सोमवारी सुरुवात झाली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनातलं आपलं पहिलंच भाषण केलं.

SHARE

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सोमवारी सुरुवात झाली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनातलं आपलं पहिलंच भाषण केलं. या भाषणात उद्धव ठाकरे यांनी उच्चपदावर गेलेल्या मराठी माणसाबद्दल गौरवोद्गार काढले.

विधीमंडळ अधिवेशनाची सुरूवात देशाचे नवे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनपर प्रस्तावानं झाली. त्यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले 'एक मराठी व्यक्ती सर्वोच्च पदी बसतो आहे, ही बाब अभिमान ऊर भरून येण्यासारखी आहे. त्यातही मूळचे नागपूरचे असलेल्या बोबडे यांचा सत्कार नागपूर अधिवेशनात होतो आहे हाही एक दुर्मिळ योगायोग आहे.

अत्यंत कष्ट आणि संघर्षातून बोबडे यांनी आजची उंची गाठली आहे. सरन्यायाधीश म्हणून ते न्यायव्यवस्थेत नवचैतन्य आणतील. रामशास्त्रींच्या बाण्यानंच न्यायदान करतील, अशी आम्हाला खात्री आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बोबडे यांनी प्रयत्न केले आहेत. यापुढंही ते अन्नदात्याला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहतील,' असा विश्वासही उद्धव यांनी व्यक्त केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या