राजकारण सुट्ट्या पैशाचं

मुंबई- तुम्हाला सुट्टे हवेत का? सुट्टे पैसे हवे असतील तर भाजप गटनेते मनोज कोटक यांच्या कार्यालयात जा. होय हे आम्ही नाही सांगत तर स्वत: मनोज कोटक यांनी महासभेत तसं सांगितलंय. सुट्टे पैसे हवे असतील तर आमच्याकडे या, आम्ही सांगतो कुठे सुट्टे पैसे मिळतील. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेतलाय विरोधकांनी. काँग्रेसच्या प्रविण छेडा यांनी तर नोटा बदलून घेण्यासाठी कोटक यांच्या कार्यालयाबाहेर रांगा लावणार असल्याचं सांगितलंय आणि ज्यांना कुणाला सुट्टे पैसे हवे असतील तर त्यांनाही येण्याच आवाहन छेडा यांनी केलय.  जेव्हा कोटक यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला तेव्हा मात्र कोटकांनी आरोप फोटाळून लावलेत. काय म्हणातायेत कोटक ते पाहा. ऐकलात ना राजकारण्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी. एकीकडे सर्वसामान्य जनता रांगांमध्ये तासनतास उभी आहे. तर दुसरीकडे मात्र राजकारणी राजकारण करण्यातच धन्यता मानताहेत. त्यामुळे हे 1000-500 रुपयांच्या नोटांचं राजकारण अजून किती दिवस सामान्य जनतेला पाहावं लागतंय देवच जाणो.

Loading Comments