SHARE

मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक आयोगानं तात्काळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रेदश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय. औरंगाबादमधल्या पैठण इथं नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना दानवे यांनी मतदानाच्या एक दिवस आधी अचानक लक्ष्मी घरात येते. अशी लक्ष्मी आली तर तिचे स्वागत करा. ती परत करू नका, असं वक्तव्य केलं होतं.

दानवे यांचं हे वक्तव्य म्हणजे मतदारांना पैसे घेऊन मतदान करा असं आवाहन आहे. निवडणुकीत कुठल्याही प्रकारे मतदारांना आमिष दाखवणं हा गुन्हा आहे. दानवे यांनी हा गुन्हा केल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होतंय. काँग्रेस विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिलीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या