'पॅरा मिलिट्री फोर्स आणि रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करा'

  Mumbai
  'पॅरा मिलिट्री फोर्स आणि रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करा'
  मुंबई  -  

  मुंबई - सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना या राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये वाकयुध्द सुरु आहे. तसेच प्रचारादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात कुरघोडीचे प्रकार केले जात आहेत. परस्परांविरोधातील भांडणे आणि पोलीस तक्रारीत वाढ होत असून, यामुळे सर्वसामान्य मुंबईकर जनतेमध्ये भीतीचे तसेच दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य हिंसक घटना टाळण्यासाठी मुंबई विभागात पॅरा मिलिट्री फोर्स आणि रॅपिड एक्शन फोर्स तातडीने तैनात करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राव्दारे केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.