Advertisement

पाऊस देवेंद्रना घेऊन गेला हेही बरे झाले, राष्ट्रवादीच्या बैठकीत फडणवीसांवर चर्चा

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवाड हे उपस्थित मिटिंगमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोबाइलवर आलेले मेसेज वाचून दाखवत होते. ‘पाऊस थांबला हे बरे झाले, जाताना देवेंद्रंना घेऊन गेला हेही बरे झाले’, त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पाऊस देवेंद्रना घेऊन गेला हेही बरे झाले, राष्ट्रवादीच्या बैठकीत फडणवीसांवर चर्चा
SHARES

महाराष्ट्रात सत्तास्थापनेची रस्सीखेच सुरू असताना निवडणूकीत झालेले आरोप प्रत्यारोपांच्या संभाषणाची सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील ‘मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन’ या संवादाने टिकटाॅकवर  धुमाकुळ घातला आहे. याच परिस्थितीबद्दल टिकटॉकवर अनेक व्हिडीओ, तर सोशल मिडीयावर मिम्स बनवले जात आहेत. अशाच एका मिममध्ये ‘पाऊस थांबला हे बरे झाले, जाताना देवेंद्रंना घेऊन गेला हेही बरे झाले’, हे वाक्य होते, याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिटिंगमध्ये झाली.

शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यावर आता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत, सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत. महाशिवआघाडी राज्यात सत्ता स्थापन करेल हे जवळजवळ निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका पार पडत आहेत. अशीच राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची एक बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीची एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या बैठकीतील, ‘पाऊस थांबला हे बरे झाले, जाताना देवेंद्रंना घेऊन गेला हेही बरे झाले’, हे वाक्य हायलाईट ठरत आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रसिद्ध झाला आहे.

आज शरद पवार दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आज पुण्यात जमले होते. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र नंतर चर्चेचा सूर बदलला आणि ती वळली ती टिकटॉक व्हिडीओ आणि मिम्सवर. त्या व्हिडिओत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवाड हे उपस्थित मिटिंगमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोबाइलवर आलेले मेसेज वाचून दाखवत होते. ‘पाऊस थांबला हे बरे झाले, जाताना देवेंद्रंना घेऊन गेला हेही बरे झाले’, त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

या बैठकीला पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार, विधिमंडळातील गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, आमदार धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य हजर होते. या सर्व नेत्यांनी आपण पाहिलेले व्हिडीओ आणि मिम्सचे किस्से या चर्चेमध्ये शेअर केले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा