Advertisement

उगाच फिरणाऱ्यांमुळे घातली २ किमीची मर्यादा, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

मुक्त आणि आनावश्यक वावर रोखण्यासाठीच पोलिसांनी २ किमी अंतराचं निर्बंध टाकल्याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

उगाच फिरणाऱ्यांमुळे घातली २ किमीची मर्यादा, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
SHARES

कोरोनाचे संकट वाढत असताना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. हे अजिबात अपेक्षित नाही. यामुळे कोरोनाची आटोक्यात ठेवलेली साथ मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभं राहील. हा मुक्त आणि आनावश्यक वावर रोखण्यासाठीच पोलिसांनी २ किमी अंतराचं निर्बंध टाकल्याचा खुलासा (do not come outside of home without reason says maharashtra cm uddhav thackeray to mumbai residents) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. पावसाळा, कोरोना तसंच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते.

खासदार अनिल देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीए आयुक्त आर राजीव, बृहन्मुंबई पालिकेचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

अनलॉकमधील नियमांनुसार जर कुणी कार्यालयांमध्ये जात असेल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जात असेल तर तुम्हाला कुणी अडवणार नाही. पण कोणतंही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, वाहनांची गर्दी होणार असेल  तर तुम्ही स्वत:चा आणि इतरांचाही धोका वाढवित आहात हे लक्षात ठेवा. तुमच्या घराच्या आसपासच्या भागामध्ये किराणा, अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू, औषधी, भाजीपाला हे सर्व काही मिळू शकतं. तुम्हाला सकाळी, संध्याकाळी उद्याने , मैदाने यांमध्ये जायचं आहे तर नजीकच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. सरकारने बहुतेक व्यवहार खुले केले आहेत, त्यामुळे नागरिक म्हणून जबाबदारीने वागणं देखील गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - घरापासून २ किलोमीटरपुढे जाऊ नका, अन्यथा तुमच्यावरही होऊ शकते कारवाई

साफसफाईत समन्वय 

मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांनी समन्वयाने या पावसाळ्यात कुठेही पाणी साचून नागरिकांचे हाल होणार नाहीत, नाले स्वच्छता, साफसफाई करताना लोकप्रतिनिधी तसंच इतर सर्वांच्या संपर्कात राहून तातडीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पावसाळ्यामध्ये मेट्रोच्या कामांमुळे तयार झालेल्या खड्ड्यांत पाणी साचण्याचा आणि पर्यायाने दुर्घटना घडणे, रोगराई वाढण्याचा संभव असल्याने सर्व प्राधिकरणांनी एकत्र येऊन ही कामे पूर्ण करावीत असंही ते म्हणाले.

मेट्रो व इतर पायाभूत सुविधा कामे आज ज्या ठिकाणी कामगारांअभावी खोळंबली आहेत तिथे तातडीने स्थानिक व्यक्तींना रोजगार देऊन ती सुरु करा, अर्धवट बांधकामे झाली आहेत तिथला कचरा, साहित्यांचे ढीग हे बाजूला करणे नितांत गरजेचे आहे. अजून पावसाला वेग आलेला नाही शक्य तेवढी ही कामे हातावेगळी करा असेही मुख्यमंत्री म्हणाले. रेल्वे, बीपीटी, विमानतळ प्राधिकरण यासर्वांचा एकमेकांत समन्वय हवा असंही ते म्हणाले.  

कोविड चाचणी

जे परराज्यातील मजूर परत राज्यात परतत आहेत त्यांची कोविड चाचणी व्हायला पाहिजे. मेट्रो मार्गावर कामांसाठी जे कमी तीव्रतेचे स्फोट केले जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी आजूबाजूच्या इमारतींना तडे गेले आहेत. मुंबई पालिकेने व एमएमआरडीएने मिळून या इमारतींचे बांधकामांचे बांधकाम ऑडिट करावं,स्थानिकांना कामांमध्ये प्राधान्य द्यावे अशा मुद्य्यांवर देखील बैठकीत चर्चा झाली.

हेही वाचा - महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन कायम, १ जुलैपासून ‘मिशन बिगीन अगेन’ २.० होणार सुरू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा