Advertisement

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, १५,३५८ लाभार्थ्यांचा समावेश

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (maharashtra assembly budget session) सोमवारपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकारकडून (maha vikas aghadi) शेतकरी कर्जमाफीची (Farmer loan waiver) पहिली यादी जाहीर करण्यात आली.

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, १५,३५८ लाभार्थ्यांचा समावेश
SHARES


विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (maharashtra assembly budget session) सोमवारपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकारकडून (maha vikas aghadi) शेतकरी कर्जमाफीची (Farmer loan waiver) पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावे आहेत. लाभार्थ्यांना १० हजार रुपये ते अडीच लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येईल.

पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी अहमदनगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यांतील २ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी जाहीर होईल. ३ महिन्यांच्या कालावधीत कर्जमाफी योजनेची प्रक्रिया पूर्ण होईल. टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर होतील. सरकारनं केलेल्या नियोजनाप्रमाणे सुरूवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला असून एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. 

महाविकास आघाडीचं (maha vikas aghadi) सरकार स्थिर झाल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. हे सरकार विरोधकांना नाही, जनतेला बांधील असल्याचंही ठाकरे म्हणाले. 

राज्य सरकारनं कर्जमाफी (Farmer loan waiver) योजनेची अंमलबजावणी करण्याआधी ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती गोळा केली होती. त्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ६८ गावातील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावं आहेत. कर्जमाफीनंतर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल. कर्जमाफीच्या अमलबजावणीचं काम जिल्हा पातळीवर सुरू झालं असून सरकारनं कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे. त्यावर २७ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी चर्चा होणार आहे.

दरम्यानशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. स्वत: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा