Advertisement

तीन वर्षांत मुलींच्या जन्मदरात वाढ - पंकजा मुंडे


तीन वर्षांत मुलींच्या जन्मदरात वाढ - पंकजा मुंडे
SHARES

स्त्री भ्रूण हत्या रोखणे आणि मुलींचा जन्मदर वाढवणे यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. माता बाल मृत्यू, कुपोषण, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृतीसह प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांपासून मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे महिला, बाल आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. 


परळमध्ये कार्यक्राम

परळमधील सेंट रेजीस येथे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ यांच्या संघटनेच्यावतीने भरवण्यात आलेल्या फेम-२०१७ च्या परिषदेत पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अभिनेत्री पुनम धिल्लाँ, शिल्पा शेट्टी, एफओजीएसआयच्या अध्यक्षा डॉ. रेश्मा पै, डॉ. वनिता राऊत डॉ. जयदीप टंक यांची प्रमुख उपस्थिती होती.


...म्हणून हा उपक्रम यशस्वी

स्त्रीरोग तज्ञ, प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ संघटना (एफओजीएसआय) मुंबई स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ सोसायटी (एओजीएस) आशिया आणि ओसियन स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसुतीशास्त्र संघटना या संस्था माता बाल मृत्यू आणि आरोग्य सेवा याविषयी चांगले काम करत आहे. या संस्थांच्या उपक्रमात प्रसिद्ध सिनेतारका, विख्यात डॉक्टर काम करत असल्याने हा उपक्रम यशस्वी होत असल्याचेही पंकजा यावेळी म्हणाल्या.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा