'नोटबंदीमुळे देशात आर्थिक अराजकतेची स्थिती'

  Dadar
  'नोटबंदीमुळे देशात आर्थिक अराजकतेची स्थिती'
  मुंबई  -  

  दादर - नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक अराजकतेची स्थिती निर्माण झाली असून, स्वतःचे पैसेही बँकेतून काढण्यावर निर्बंध घातले जात आहेत. या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडत असून, भाजप आणि केंद्र सरकार देशात फॅसिझम आणू पाहात असल्याची टीका खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केलीय. टिळकभवन येथे संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्याचवेळी देशातल्या दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकांना संविधानाने संरक्षण दिले आहे. ते संविधान बदलण्याचा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव असल्याचा आरोप जनार्दन चांदूरकर यांनी केलाय. यावेळी 26/11 हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे, अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष रवींद्र दळवी, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.