Advertisement

काँग्रेसच्या नितेश राणेंचं मत प्रसाद लाड यांना


काँग्रेसच्या नितेश राणेंचं मत प्रसाद लाड यांना
SHARES

विधान परिषदेच्या एका जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांना मत दिल्याची कबुली प्रसार माध्यमांना दिली.


माझं मत जगजाहीर

मी नारायण राणेंचा कार्यकर्ता आहे. माझं मत कोणाला गेलं असेल हे जग जाहीर आहे. यामध्ये लपवण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत नितेश राणे यांनी 'क्रॉस व्होटींग' केल्याची कबुली दिली. ''हात माझा होता आणि डोके राणे साहेबांचं.'' माझ्यावर कारवाई करण्याची हिंमत तरी करू द्या, मग बघू, असं देखील नितेश राणे यावेळी म्हणाले.काय म्हणाले नितेश राणे?

राणे साहेब उभे राहिले असते तर सगळ्या पक्षांचे मुखवटे बाहेर आले असते. आमची ३१ मतांची तयारी होती. राणे साहेबांच्या बाजूने मतदान करण्यासाठी इतर ३१ आमदार तयार होते. काही पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे नातेवाईक पण आमच्या सोबत होते. आज बऱ्याच पक्षाचे वस्त्र हरण झाले असते. हे सरकार स्थिर आहे. शिवसेना असो किंवा नसो. नार्वेकर पोलिंग एजंट राहिले आमदार कधी होणार?


माझं मतही लाड यांना - आ. कदम

माझं मत प्रसाद लाडांना असं  सांगत राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांना मतदान कल्याचं स्पष्ट केलं. विधान परिषद पोटनिवडणुकीत मतदान करण्यासाठी रमेश कदम अर्थर रोड, भायखळा येथील तरूंगातून थेट विधानभवनात आले होते.

मतदानानंतर माध्यमांशी बोलताना कदम म्हणाले, " गेली सव्वा दोन वर्षे मी तुरुंगात आहे. या काळात मी राजकीय वातावरण बघितलं आहे. मी केवळ महामंडळातून कर्ज वाटप केलं आहे. देशात अनेकांनी कोट्यवधींचे घोटाळे केले; पण त्यांना जमीन मिळतोय. मात्र मला अजून जामीन मिळत नाही. मी माझं मत प्रसाद लाड यांना दिलं आहे. त्यासाठी माझ्यावर कुणाचाही दबाव नाही.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा