‘चुकीचे दिसेल तिकडे बोट उचला’

    मुंबई  -  

    मुंबई - मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बनवण्याची जबाबदारी मुंबईकरांची आहे. मुंबईकरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. फक्त काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या तर मुंबईसारखं दुसरं शहर होऊच शकत नसल्याची प्रतिक्रिया राज्यसभेचे सदस्य अॅड. माजिद मेमन यांनी ‘मुंबई लाइव्ह’च्या उंगली उठाओ या विशेष कार्यक्रमात दिली. यावेळी त्यांनी ‘मुंबई लाइव्ह’च्या 'उंगली उठाओ' या विशेष कार्यक्रमाचे कौतुकही केले. तसेच आजूबाजूला काही चुकीचे घडत असेल तर त्यावर मुंबईकरांनी त्याची दखल घेत त्यावर व्यक्त व्हायला हवे. यावेळी त्यांनी महिला सुरक्षा यासारख्या अनेक मुद्यावर भाष्य केले.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.