जोगेश्वरी - राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याहस्ते जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्थानकापासून पश्चिमेस जोडणाऱ्या पादचारी पुलाचे भूमिपूजन करण्यात आलं. या पूलाच्या कामासाठी 12 कोटी 67 लाख 23 हजार इतका खर्च करण्यात येणार आहे. जोगेश्वरी पूर्वमधून पश्चिमेस जाण्यास पूल नसल्याने याअगोदर पादचारी पूल नव्हता त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. जीव ओलांडून अनेकांना रूळ ओलांडावे लागत होते. या सोहळ्यास आमदार सुनील प्रभू, शाखाप्रमुख अमर मालवणकर यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.