सुशील शिलवंत यांचा भाजपात प्रवेश

Dadar
सुशील शिलवंत यांचा भाजपात प्रवेश
सुशील शिलवंत यांचा भाजपात प्रवेश
सुशील शिलवंत यांचा भाजपात प्रवेश
See all
मुंबई  -  

दादर - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापली पक्ष संघटना बळकट करण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दादर-माहीम विधानसभा क्षेत्रातले मनसेचे महाराष्ट्र सचिव सुशील शिलवंत यांनी दोन हजार कार्यकर्त्यांसह रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला. एलफिन्स्टन रोड येथे आयोजित केलेल्या 'पक्ष प्रवेश सोहळा' कार्यक्रमात ते भाजपाध्ये दाखल झाले.

या वेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, दादर विधानसभा मंडळ अध्यक्ष विलास आंबेकर आणि आशिष साळसकर आदीही उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.