मानखुर्दमध्ये मनसेला झटका

  Mandala
  मानखुर्दमध्ये मनसेला झटका
  मुंबई  -  

  मानखुर्द - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मानखुर्दमध्ये मनसेला मोठा झटका बसलाय. बुधवारी मानखुर्दमधील मनसेच्या वाहतूक सेनेचे महाराष्ट्र चिटणीस सुधीर नवले यांनी पत्नी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मानखुर्दमधील नालेसफाईच्या मुद्द्यावर एम पूर्व कार्यालयात 'कचरा फेको' आंदोलनामुळे नवले चर्चेत आले होते. त्यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेला या भागात जोरदार धक्का बसला आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत नवले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.