Advertisement

मोदी सरकार शेतकऱ्यांना सक्षम करेल - राजनाथ सिंह


मोदी सरकार शेतकऱ्यांना सक्षम करेल - राजनाथ सिंह
SHARES

भाजप सरकारने शेतकरी कर्जमाफीपासून सर्जिकल स्ट्राईकपर्यंत अत्यंत धाडसी निर्णय घेऊन ते पूर्णही करून दाखवलेत. त्यामुळे जनता पूर्णपणे सरकारच्या पाठिशी असून सरकार अतिशय भक्कम स्थितीत आहे. सध्या शेतकरी संकटातून जात आहेत. हे खरं असलं तरी हे सरकार शेतकऱ्यांना इतकं सक्षम करेल की हेच शेतकरी 2022 पर्यंत दुप्पट पीक घेतील, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते गुरूवारी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मागील तीन वर्षांत देशाला नवीन ओळख मिळवून दिली आहे. या काळात प्रत्येक प्रश्नावर केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठिमागे हिमालयाप्रमाणे उभे राहिले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशीही मोदी सरकार ठामपणे उभे आहे. सध्या काहीजण शेतकऱ्यांच्या पाठीमागून सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यांना आम्ही सर्वांसमोर आणू.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मागील पंधरा वर्षांत काँग्रेसने जी कामे केली नाहीत, ती कामे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 700 दिवसांत करून दाखवली आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा