Advertisement

करारा जबाब मिलेगा, मनसे हल्ल्यावर निरूपमचं उत्तर, संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

मनसेने काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मनसे विरूद्ध निरूपम यांच्यात आता ट्विटर वाॅर सुरू झालं आहे. संजय निरूपम यांनी मनसेचा हा भ्याड हल्ला असून मनसेला सडेतोड उत्तर देऊ, असं ट्विट करत मनसेला टार्गेट करण्याचा पुन्हा प्रयत्न केला आहे.

करारा जबाब मिलेगा, मनसे हल्ल्यावर निरूपमचं उत्तर, संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
SHARES

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला मनसे विरूद्ध निरूपम वाद शिगेला पोहोचला असून हाणामारी-तोडफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांकडून सातत्याने मारहाण होत असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करत जशास तसं उत्तर दिलं. 'इट का जबाब पत्थरसे' असं म्हणत मनसेने काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मनसे विरूद्ध निरूपम यांच्यात आता ट्विटर वाॅर सुरू झालं आहे. संजय निरूपम यांनी मनसेचा हा भ्याड हल्ला असून मनसेला सडेतोड उत्तर देऊ, असं ट्विट करत मनसेला टार्गेट करण्याचा पुन्हा प्रयत्न केला आहे.


काय म्हणाले निरूपम?




मनसेचे झेंडे जाळले

काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचे झेंडे जाळत संताप व्यक्त केला. तर अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मनसेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. या दरम्यान निरूपम यांनी त्वरीत ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे. सकाळी कार्यालयात कुणी नसताना हा हल्ला केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर हल्ला झाला तिथून केवळ २५ मीटर अंतरावर पोलीस ठाणे होतं तरीही हल्ला झाल्याचं म्हणत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी निरूपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.






कार्यकर्त्यांचं कौतुक

दुसरीकडे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ज्याने कुणी हा हल्ला केला त्या मनसे कार्यकर्त्यांचा आपल्याला अभिमान आहे. हा तर शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेला गनिमी कावा आहे, असं म्हणत हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या हल्ल्याचा निषेध करत या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही विखे पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

हल्ल्यानंतर काही मिनिटांतच ट्विट करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, हल्ल्याचं समर्थन करणं देशपांडे यांना चांगलंच महागात पडलं आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी दुपारी देशपांडे यांना ताब्यात घेत कफ परेड पोलिसांकडे सुपूर्द केलं. कफ परेड पोलिसांकडून देशपांडे यांची चौकशी सुरू असल्याचं समजतं आहे. तर याआधीच याप्रकरणी ८ मनसे कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा