Advertisement

शिवसेना-मनसेच्या युतीसाठी 'तो' चढला पुलावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावं, यासाठी सेनेच्या कार्यकर्त्याने रविवारी दुपारी दादर टीटी येथील जग्गनाथ नाना शंकर शेठ या उड्डाणपुलाच्या कमानीवर चढून स्टंटबाजी केली.

शिवसेना-मनसेच्या युतीसाठी 'तो' चढला पुलावर
SHARES

मराठी माणसाच्या भल्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावं, यासाठी सेनेच्या कार्यकर्त्याने रविवारी दुपारी दादर टीटी येथील जग्गनाथ नाना शंकर शेठ या उड्डाणपुलाच्या कमानीवर चढून स्टंटबाजी केली. वेळीच माटुंगा पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवलं.

 

सुरक्षारक्षकांची नजर चुकवून...

मूळचा यवतमाळचा रहिवासी असलेल्या श्याम गायकवाड हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. राज्यात मराठी माणसांवर वेळोवेळी अन्याय केला जात असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतभेद विसरून मराठी माणसासाठी एकत्र यावं, या मागणीसाठी रविवारी सकाळी शाम दादर टीटी येथील बागेतील सुरक्षारक्षकांची नजर चुकवून जगन्नाथ शंकरशेठ या उड्डाणपुलाच्या कमानीवर चढला.


आणि त्याला खाली उतरवलं

उद्धव आणि राज या दोघांचे फोटो हातात घेऊन त्याने परिसरातील नागरिकांचं लक्ष केंद्रीत करून घेतलं. याबाबतची माहिती एका स्थानिक रहिवाशाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर माटुंगा पोलिस आणि दादर अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी वेळीच श्याम याची समजूत काढून त्याला खाली उतरवल्याचं वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कराडे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा