• तिकिटासाठी राजकारणी दुर्गामातेच्या चरणी

SHARE

भांडुप - पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी भांडुपमधील इच्छुक उमेदवारांनी दुर्गामातेच्या चरणी नतमस्तक होत मोर्चेबांधणी करण्यास सुरू केली आहे. मुंबईसह, ठाण्यातील दिग्गज राजकारणी भांडुपमधील दुर्गामातांच्या दर्शानासाठी येत असल्याने यंदाच्या नवरात्रौत्सवला राजकीय रंग चढला आहे.

कित्येक वर्षांनतर भांडुपमधील दोन प्रभाग खुले झाले आहेत. तर उरलेले पाच प्रभाग महिलांसाठी खुले असल्याने या दोन प्रभागांवर भांडूपमधील अनेक दिग्गजांनी आपली दावेदारी सांगत, शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.
भांडुपची आई नावाने प्रसिद्ध असलेल्या उत्साही मित्र मंडळाच्या नवरात्रौत्सवामध्ये राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार आणि माजी वेैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर, सेनेचे आमदार अशोक पाटील, भारतीय जनता माथाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजी पाटील सहभागी झाले होते. तर माय मराठी प्रतिष्ठानच्या नवरात्रौत्सवाला मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे, काॅंग्रेसचे माजी आमदार शाम सावंत आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेला त्यांचा मुलगा रितेश सावंत यांनी उपस्थिती लावत दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या