शिवसेनेच्या पोस्टर्सवर काँग्रेसचे नेते

इतिहासाचे दाखले देत भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपाला पोस्टरमधून बहुदा शिवसेनेकडून उत्तर दिले असावे.

SHARE

तब्बल २ दशकानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजेच उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर शपत घेणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू असताना. सेनाभवनजवळ उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारे पोस्टर सर्वांचेंच लक्ष वेधून घेत आहेत.  कारण ही तसचं आहे, प्रथमच सेनेच्या पोस्टरवर इतिहासाची आठवण करून देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो  आहेत. या फलकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्याबरोबरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे फोटो आहेत.

इतिहासात वळून पाहिले तर, पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ ला देशात आणीबाणी घोषित केली होती. या निर्णयाला देशभरातून विरोध होत असताना बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. त्यानंतर काँग्रसेच्यावतीने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून असलेल्या प्रतिभा पाटील यांनाही बाळासाहेब ठाकरेंनी निवडणुकीत पाठिंबा देण्याची स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे शरद पवार आणि बाळासाहेब यांच्यात वैयारिक मतभेद जरी असले. तरी दोघांमधील मैत्रीचे संबध वेळोवेळी पहायला मिळायचे. याच इतिहासाचे दाखले देत भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपाला पोस्टरमधून बहुदा शिवसेनेकडून उत्तर दिले असावे.

शिवसेनाप्रमुखांचे शरद पवार व इंदिरा गांधी यांच्यासोबतचे हे पोस्टर स्थानिक आमदार सदा सरवणकर व त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी शिवाजी पार्कच्या चौकात लावले आहेत. उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कमध्ये सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटाला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या