प्रबोधन ठाकरेंना शिवसैनिकांची आदरांजली

 Pali Hill
प्रबोधन ठाकरेंना शिवसैनिकांची आदरांजली

दादर - संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी, मराठी पत्रकार आणि समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या 43व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी आदरांजली वाहण्यात आली. प्रबोधनकार ठाकरे उद्यानात आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली होती. प्रबोधनकारांच्या पुतळ्याला माजी खासदार मनोहर जोशी यांच्या हस्ते पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.

या वेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, उपविभाग प्रमुख मुत्तू तेवर, स्थापत्य समिती अध्यक्ष प्रकाश आचरेकर, नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुखांसह आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Loading Comments