राहुल गांधी बुधवारी भिवंडी कोर्टात

  Pali Hill
  राहुल गांधी बुधवारी भिवंडी कोर्टात
  मुंबई  -  

  मुंबई - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बुधवारी भिवंडी न्यायालयात हजरी लावणार आहेत. 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी भिवंडीत आले होते. त्यावेळी सोनाळे येथील प्रचारसभेत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी संघावर आरोप केला होता. त्याची दखल घेत संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात 6 मार्च 2014 रोजी याचिका केली होती. आधीही या केससंदर्भात राहुल गांधी भिवंडीत आले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या इतर याचिकांसोबत त्याची सुनावणी झाली. या याचिकेतील मु्द्दे आणि आरोपांमुळे ही याचिका पुन्हा भिवंडी कार्टात सुनावणीसाठी आली. दरम्यान माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 15 तारखेला काँग्रेसच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. त्या कार्यक्रमालाही राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.