Advertisement

राज यांची आतिषबाजी, मुख्यमंत्र्यांसह अमित शाहंवर टीका


राज यांची आतिषबाजी, मुख्यमंत्र्यांसह अमित शाहंवर टीका
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून सभांमधून अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. इतकंच काय तर व्यंगचित्राच्या माध्यमातूनही त्यांची राजकीय आक्रमकता दिसून येत आहे. त्यांच्या निशाण्यावर नेहमीच भाजप, मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना राहिली आहे. दिवाळीतही राज यांची व्यंगचित्रात्मक आतिषबाजी सुरूच आहे. राज यांनी दिवाळीत मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्यावर फटाके फोडले आहेत.


काय आहे व्यंगचित्रात?

दिवाळीतील अभ्यंगस्नानासाठी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय असं सांगणाऱ्या आशयाच व्यंगचित्र राज यांच्या कुंचल्यातून बाहेर पडलं आहे. तर दुसरीकडे अमित शाह यांना नरकासुराची उपमा देत त्यांना चिरडताना दाखवलं आहे. हे दोन्ही व्यंगचित्र भाजपला झोंबणारे असल्याची चर्चा रंगली आहे.


राज यांनी धनत्रयोदशीलाही व्यंगचित्रातून भाजपला टार्गेट केलं होतं. संपूर्ण देश आयसीयूत गेलेला दाखवला होता. तर आता राज यांनी थेट अमित शाह आणि मुख्यमंत्री यांच्यावरच आतिषबाजी केली आहे.


व्यंगचित्राची चांगलीच चर्चा

अभ्यंगस्नान करण्यासाठी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय असं सांगणं असो वा नरकासुराच्या रुपातील अमित शाह असो दिवाळीत राज यांच्या या व्यंगचित्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. आजच्या दिवशी श्रीकृष्णने नरकासुराचा वध केला. त्यामुळे आजच्या दिवशी नरकचतुर्दशी साजरी केली जाते. तसंच अमित शाह यांना भाजप कार्यकर्ते चिरडताना दिसत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा