रवीकिशन बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात

  मुंबई  -  

  दहिसर - चौथी प्रसाद गुप्तांच्या प्रचार रॅलीत काँग्रेसचा नेता आणि भोजपुरी अभिनेता रवीकिशन सहभागी झाला होता. महानगरपालिका आर उत्तर विभागातील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी करून गुप्ता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या वेळी रवीकिशन याने चौथी प्रसाद गुप्तांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन लोकांना केले.

  चौथी प्रसाद गुप्तांशी चांगले सबंध असल्याकारणाने आपण या प्रचारात सहभागी झाल्याचं रवीकिशन म्हणाला. असं सांगितलं जातं की, चौथी प्रसाद गुप्ता हे काँग्रेसचे नेते होते. ते वॉर्ड क्र. तीनमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.