Advertisement

...तोपर्यंत उपोषण मागे नाही, संभाजी राजेंचा निर्धार

मराठा आरक्षणाच्या मुद्दावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

...तोपर्यंत उपोषण मागे नाही, संभाजी राजेंचा निर्धार
SHARES

मराठा आरक्षणाच्या मुद्दावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं संभाजीराजे यांना चर्चेसाठी निमंत्रण धाडलं असून प्रतिनिधी वर्षावर चर्चेला जातील असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, तिथे जर निर्णय होऊ शकला नाही तर पुन्हा माझ्याशी प्रतिनिधी चर्चा करतील अशी माहिती राजे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत दिली. असं असलं तरी आरक्षणचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत उपोषण मागे घेण्यास संभाजीराजे यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

“मराठा आरक्षणबाबत २२ मागण्या पुढे आल्या, त्यापैकी ६ मागण्या आम्ही मांडल्या आहेत. या मागण्यांवर राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं. यासाठी केंद्र सरकारकडे जाण्याची गरज नाही. तसंच या मागण्यांसाठी न्यायालयाचे कोणते निर्बंध आहे असंही काही नाही, याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. मी उपोषण करत आहे, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय,” असं खासदार संभाजीराजे म्हणाले.

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आज सकाळी संभाजीराजे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अशक्तपणा आणि तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत असल्याचं संभाजी राजे यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही प्रकारची औषधं घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.



हेही वाचा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरेंची निवड

दिशा सॅलियन मृत्यूप्रकरण: 'या' नेत्यांवर कारवाई करण्याचे राज्य महिला आयोगाचे निर्देश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा