भाजपाच्या आता मित्रपक्षांशी वाटाघाटी

  Mumbai
  भाजपाच्या आता मित्रपक्षांशी वाटाघाटी
  मुंबई  -  

  मुंबई - शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यावर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची मित्रपक्षांबरोबर वाटाघाटीबाबत अंतिम चर्चा सुरु आहे. शिवसेनेसोबत युती तुटल्यावर मित्रपक्षांची समजूत काढण्यास भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत.

  जागा वाटपाबाबत मुंबईतील रंगशारदा सभागृहात भाजपा आणि मित्रपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, रिपाइंकडून अविनाश म्हातेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि महादेव जानकर यांच्याकडून रासपचे पदाधिकारी उपस्थित होते. मित्रपक्षांनी भाजपाच्याच चिन्हावर लढण्याचा आग्रह भाजपा नेत्यांनी केला आहे. तर भाजपाच्या चिन्हावर लढणार नसल्याची भूमिका रिपाइंने घेतली आहे. इतर मित्रपक्ष दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

  मित्रपक्षाला हव्यात एवढ्या जागा -

  • रिपाइं - 65 जागा
  • रासप - 20 जागा
  •  शिवसंग्राम - 9
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.