Advertisement

भाजपा मनोरंजन करताना सिनेमागृहे, नाट्यगृहे उघडण्याची गरजे काय? -संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी भाजपवर हल्ला चढवला असून, भाजपा जनतेला मनोरंजन करत आहेत, तर कोरोनाच्या काळात सिनेमागृहे आणि नाट्य सभागृहे उघडण्याची गरज काय? असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

भाजपा मनोरंजन करताना सिनेमागृहे, नाट्यगृहे उघडण्याची गरजे काय? -संजय राऊत
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून हळुहळू अर्थचक्र आता रुळावर आहेत. दिवसेंदिवस कोरोनारुग्ण कमी आढळत असल्यानं विविध सोयीसविधा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. अशातच राज्य सरकार २२ ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शिवाय याआधी सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत असून, राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी भाजपवर हल्ला चढवला असून, भाजपा जनतेला मनोरंजन करत आहेत, तर कोरोनाच्या काळात सिनेमागृहे आणि नाट्य सभागृहे उघडण्याची गरज काय? असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामानाच्या 'रोखठोक'मधून संजय राऊत यांनी म्हटलंय. कोरोनाचा कहर आणि लॉक डाऊनचे निर्बंध कायम असले तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लॉक डाऊनचे निर्बंध काही प्रमाणात उठले, पण नाटक, सिनेमा थिएटर्स उघडण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे लोक राजकीय बातम्यांतूनच स्वतःचे मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली की महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा आणि नाटय़गृहांची खरेच गरज आहे काय, असे वाटते. सर्वत्रच विनोद व रहस्यमय असे मनोरंजन सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळुन खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती एसओपी तयार करणयाचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करणयात येईल. आज टास्कफोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत चर्चा केली.

याआधीही कोरोना व्हायरसच्या साथीमुळेच सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अनिवार्य होते. निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे पालन करण्यासदेखील सांगितले होते. यंदा देखील अशाच पध्दतीची नियमावली सरकार जाहीरकरू शकते. कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगकर्मी, प्रेक्षक अशा सर्वांनाच या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा